Mahalunge : कंपनीच्या वेअर हाऊसमध्ये चोरी करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – कुरुळी येथील एका वेअर हाऊस मध्ये (Mhalunge) चोरी करणाऱ्या दोघांना म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांनी पाच लाख एकोणीस हजारांचा ऐवज चोरून नेला होता.

आलम युसूफ मणियार (वय 32, रा. कुदळवाडी, मूळ रा. उत्तर प्रदेश), गणेश रामबाबू निशाद (वय 22, रा. भोसरी. मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

कुरुळी येथील आर बी सी सप्लाय चेन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वेअर हाऊस मधून पाच लाख 19 हजार 278 रुपये किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सहा एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली त्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी दोघांना अटक केली. आरोपी आलम युसूफ मणियार याच्या विरोधात पिंपरी, पौड, महाळुंगे, चाकण पोलीस ठाण्यात अकरा गुन्हे दाखल आहेत.

Talegaon : लहान हॉटेल व्यवसायिकांना रात्री अकरा पर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील, पोलीस उप निरीक्षक (Mhalunge) विलास गोसावी, सहायक फौजदार थेऊरकर, अंमलदार राजू कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष होळकर पोना संतोष काळे, किशोर सांगळे, विठ्ठल वडेकर, जमदाडे, शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, शरद खैरे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड यांनी केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.