Talegaon : लहान हॉटेल व्यवसायिकांना रात्री अकरा पर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – तळेगाव शहरातील छोट्या हॉटेल चालकांना व चायनीज हॉटेल चालकांना रात्री अकरा पर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, (Talegaon) अशी मागणी जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांकडे केली. या मागणीचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती मदेवाड यांना देण्यात आले. 

यावेळी चायनीज असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता भोसले, प्रवक्ते मिलिंद अच्युत, जनसेवा विकास समितीचे संघटक योगेश पारगे, शिवसेना तालुका संघटक सुनील उर्फ मुन्ना मोरे, नगरसेवक रोहित लांघे, पोलीस अधिकारी प्रशांत वाबळे, बाबाराजे मुंडे, किशोर गिरीगोसावी आदी उपस्थित होते.

तळेगाव शहरांमध्ये अनेक स्थानिक नागरिक तसेच परप्रांतीय देखील छोटे व्यवसाय करीत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने चायनीज स्टॉल, स्नॅक्स स्टॉल, ज्यूस स्टॉल, आईस्क्रीम स्टॉल, चाट मसाला स्टॉलच्या माध्यमातून आपल्या रोजी रोटीचा प्रश्न सोडवत आहेत.

Chinchwad: 2024 काय आताच मुख्यमंत्रीपदावर क्लेम – अजित पवार

तळेगाव दाभाडे पोलिसांनी सर्वांना रात्री दहापर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याबाबत सूचना दिल्या होत्या. दहापर्यंत वेळ असल्यामुळे लहान व्यवसायिकांना मिळणारा नफा अत्यल्प आहे.(Talegaon) त्यामुळे सर्व छोट्या हॉटेल व्यवसायिकांनी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्याकडे हा प्रश्न सोडवण्यासाठी विनंती केली. त्यानुसार आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांकडे रात्री अकरा पर्यंत लहान व्यवसायिकांना व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी देण्याबाबत निवेदन दिले आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांचे तळेगाव शहरावर आणि गावातील नागरिकांवर प्रेम असल्यामुळे ते व्यापाऱ्यांच्या हिताचा निर्णय लवकरच घेतील, असा विश्वास जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.