Chinchwad : उद्धव ठाकरे यांच्यासोबत आनंदाने तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत नाईलाजाने काम – अजित पवार

एमपीसी न्यूज –  तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि (Chinchwad) उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात मी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. या  दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता. ठाकरे यांच्यासोबत आनंदाने समाधानाने काम केले. पण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत नाईलाजाने आणि वरिष्ठांनी सांगितल्यामुळे काम केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

चिंचवड येथील मुलाखतीवेळी ते बोलत होते. आमचे दैवत शरद पवार, बहीण सुप्रिया सुळे यांच्याबाबत पुरंदरचे त्यावेळेचे आमदार विजय शिवतारे हे अतिशय खालच्या पातळीवर टीका करत होते. त्यामुळे ठरवून आणि जाहीर सांगून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवतारे यांना पाडले. कोणाला मस्ती आली तर ती जिरविण्याची आपल्यात ताकद असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत नसल्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, राजकारणात विनाकारण कोणावर टीका करत नाही.

Mahalunge : कंपनीच्या वेअर हाऊसमध्ये चोरी करणाऱ्या दोघांना अटक

चुकीचे असेल तर टीका करत असतो. राजकीय विचारधारा वेगळी (Chinchwad) असली. तरी, आम्ही एकमेकांचे दुष्मन नाहीत. आम्ही एकमेकांचे ‘गचुरे’ धरावे असे तुम्हाला वाटते का, विनाकारण देवेंद्र फडणवीस आणि माझे साटेलोटे असल्याचे सांगितले जाते.

पण, तसे काही नाही. आमचा जन्म एकाच दिवशीचा आहे. माणसे हेरुन आम्ही त्यांना संधी देतो. असेच हेरून सुनील शेळके, नीलेश लंके यांना पक्षात आणून आमदार केले, असेही ते म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.