Pune : महापालिकेच्या शिवसृष्टीबाबत उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्वपूर्ण

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेची भव्य अशी शिवसृष्टी बीडीपीच्या 50 एकर जागेत उभारणार असल्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, अद्यापही शिवसृष्टीची प्रक्रिया काही सुरू झाली नाही.

_MPC_DIR_MPU_II

कोथरूड कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टीचे आरक्षण होते. मात्र, ही जागा मेट्रोच्या डेपोला देण्यात आली आणि शिवसृष्टी बीडीपीच्या 50 एकर जागेत उभारणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. तर, शिवसृष्टीपर्यंत मेट्रो नेणार असल्याचे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले होते.

महापालिकेची भव्य अशी शिवसृष्टी व्हावी, यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी शिवसृष्टी संदर्भात मुंबईला बैठक घेतली होती. त्यावेळी दीपक मानकर स्वतः उपस्थित होते. तर, महापालिकेची शिवसृष्टी होणारच असल्याचा ठाम विश्वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1