Charholi News : डुडुळगाव येथील अनधिकृत बांधकामावर हातोडा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने
‘इ’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत डूडुळगाव येथील अनधिकृत नवीन सुरू असलेल्या आणि आरक्षणमधील अनधिकृत बांधकामावर आज (बुधवारी) कारवाई करण्यात आली. आरसीसी बांधकामे, पत्राशेड, वीट अशा 14 बांधकामावर कारवाई करण्यात आली. 12 हजार 70 चौरस मीटर अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.

महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जात आहे. दररोज शहराच्या विविध भागात कारवाईचा धडाका सुरु आहे. पत्राशेड, बांधकामे भुईसपाट केली जात आहेत. ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत डूडुळगाव येथील अनधिकृत नवीन सुरू असलेल्या आणि आरक्षणमधील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सह शहर अभियंता मकरंद निकम मार्गदर्शनाखाली तसेच कार्यकारी अभियंता संजय घुबे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. उप अभियंता हेमंत देसाई, सूर्यकांत मोहिते यांच्या अधिपत्याखाली कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस सुरक्षाबलाचे 54 जवान, दिघीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक असा तगडा बंदोबस्त होता. मजूर, जेसीबी, पोकलेन, जॉकटरच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.