_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Chota Rajan Alive : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या निधनाचे वृत्त खोटे 

एमपीसी न्यूज – अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या निधनाचे वृत्त खोटे असल्याची माहिती दिल्लीत एम्स रुग्णालयाने दिली आहे. छोटा राजन याचे कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी प्रसारित करण्यात आली होती. 

छोटा राजन याला कोरोनाची लागण झाली असून उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल आहे. त्याचे कोरोनामुळे निधन झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान ही बातमी खोटी असून, त्याच्यावर अजून उपचार सुरू आहेत असे एम्स रुग्णालयाने म्हटले आहे.

छोटा राजनवर अपहरण, खून यासह 70 हून अधिक गुन्हे दाखल होते. मुंबईतील वरिष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डें यांच्या हत्या प्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवताना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. काही दिवसांपूर्वी त्याला हनीफ कडावाला हत्या प्रकरणात विशेष सीबीआय कोर्टाने त्याला दोषमुक्त केलं होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.