Urban Skyline : ‘अर्बन स्कायलाईन’मध्ये दसऱ्याला ‘लॅवीश’ फ्लॅट बुक करा आणि मिळवा घसघशीत सवलत

एमपीसी न्यूज – तुम्हाला तुमच्या गॅलरीतून आकाशाला गवसणी घालायची आहे का?…. काही हरकत नाही…. पुणेकरांनो आता हेही स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे! तुमचे हे स्वप्न ‘अर्बन स्कायलाईन’ (Urban Skyline) सत्यात आणणार आहे. रावेत येथे ‘अर्बन स्कायलाईन’ भव्य, सुसज्ज व पुण्यातील सर्वांत उंच म्हणजे तब्बल 40 मजली उंच गृहप्रकल्प लवकरच उभारणार आहे. जेथे तुम्हाला 70 पेक्षाही जास्त आधुनिक व सुसज्ज सोयीसुविधा मिळणार आहेत. नवरात्र उत्सव आणि दसऱ्यानिमित्त अर्बन स्कायलाईनने घसघशीत सवलत जाहीर केली आहे.

अर्बन स्काईनमध्ये (Urban Skyline) पाच ऑक्टोबर 2022 पर्यंत फ्लॅट खरेदी केल्यास 3 बीएचके वर तब्बल 6 लाख 99 हजार 999 रुपयांची तर 2 बीएचके फ्लॅटवर तब्बल 4 लाख 99 हजार 999 रुपयांची घसघशीत सूट ग्राहकांना मिळू शकणार आहे.

हा प्रकल्प अशा मोक्याच्या ठिकाणी आहे, जिथे वर्किंग लोकांना हिंजवडी, पिंपरी-चिंचवड तसेच तळेगाव व चाकण या इंडस्ट्रीयल झोनला सहज पोहोचता येणार आहे. शिवाय, ‘अर्बन स्कायलाईन’ हा प्रोजक्टवरून तुम्ही पिंपरी-चिंचवड, कात्रज व कोथरूड अशा ठिकाणी सहज जाऊ शकता. या शिवाय नवी मुंबई हे शहर देखील अवघ्या 70 मिनिटांवर आहे.


‘अर्बन स्कायलाईन’ केवळ उंचच घरे नाही, तर एखाद्या स्वप्नात तुम्ही साकारली असतील. अगदी तशीच आधुनिक व लॅवीश घरे तुम्हाला येथे उपलब्ध असणार आहेत. यामध्ये 2 बीएचके, 3 बीएचके, 4 बीएचके ते चक्क 6 बीएचके फ्लॅट साकारले जाणार आहेत. या प्रोजेक्टचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे प्रोजेक्टच्या 150 फूट उंचीवर कव्हर स्काय वॉक असणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या सोसायटीमध्येच जॉगिंग व उंचावरून चालण्याचा आनंद लुटता येणार आहे.

या बरोबरच 450 फूटांवर मून डेक, इन्फिनिटी पूल, सन डेस्क, शॉवर एरिया विथ चेंजिंग रुम, गॅझेबो, बार्बेक्यू स्टेशन अँड मॉकटेल बार, कम्युनिटी किचन, लँडस्केप गार्डन, ओपन पार्टी एरीया यांचा समावेश असणार आहे.

याबरोबरच ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचा विचार करून अनेक सोयी-सुविधा ‘अर्बन स्कायलाईन’ (Urban Skyline) तुम्हाला पुरवणार आहे. त्यामध्ये पडल पूल, किड्स पूल, टेम्परेचर कंट्रोल जकुझी, टोडलर रूम, जिम, टॉय लायब्ररी, बुक्स लायब्ररी, इनडोअर गेम्स, कॉफी लॉन्च, मल्टीपर्पज रुम ज्यामध्ये योगा, झुम्बासारखे व्यायाम नागरिकांना करता येणार आहेत. तसेच, वाढदिवस किंवा घरगुती कार्यक्रमासाठी बँक्वेट हॉल, गेस्ट रूम व को-वर्कींग स्पेस अशा अगदी स्वप्नवत सुविधा तुम्हाला येथे मिळणार आहेत.

याबरोबरच सुसज्ज व मोठा पार्किंग एरिया, मुलांसाठी खेळणी, फुले तसेच आयुर्वेदीक वनस्पती असलेली बाग, गणेशाचे मंदिर, पेट ग्रुमींग एरीया, सँन्डपीट एरीया, योगा गार्डन, स्कूल बससाठी पिकअप आणि ड्रॉप पॉईंट अशा अंतर्गत सुविधा बरोबरच ‘अर्बन स्कायलाईन’पासून विविध मार्ट, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज हे अगदी पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर आहेत.

येथे 2 बीएचकेचा 755 ते 905 स्क्वेअर फीट एवढा कार्पेट एरीया असणार आहे.  तर, 3 बीएचकेसाठी 1 हजार 42 ते 1 हजार 125 स्क्वेअर फीट, तसेच 4 बीएचकेसाठी 1 हजार 550 स्क्वेअर फीट ते 1 हजार 644 स्क्वेअर फीट व सर्वात मोठे फ्लॅट म्हणजे 6 बीएचकेसाठी 2 हजार 220 स्क्वेअर फूट एवढा एरिया असणार आहे. त्यामुळे प्रशस्त जागा व हवेशीर, पुरेसा सूर्यप्रकाश असणारे फ्लॅट नागरिकांना येथे मिळणार आहेत.

त्यामुळे ‘स्काय इज द लिमीट’ म्हणणाऱ्यांसाठी अर्बन स्कायलाईन ती लिमिटही तुमच्या आवाक्यात आणू पहात आहे. तेही सर्व सोयी-सुविधांसकट! यात काही शंका नाही. हे झाले प्रोजेक्टच्या बाहेरील अमेनिटीज; पण घराच्या आतही मंडळी तुम्हाला एसी पॉईन्ट, एअर प्युरिफायर, वॉटर प्युरिफायर, सोलर वॉटर, अलेक्सा इनेबल्ड होम, सेक्युरिटी, फायर सेफ्टी या बरोबरच पार्किंग एरियामध्ये कार चार्जिंग स्टेशन, कार वॉशिंग एरिया, एअर पंप स्टेशन यांचीही सुविधा असणार आहे.

मग वाट कसली बघताय? उंचावर राहण्याचे स्वप्न उराशी बाळगत असाल, तर ‘अर्बन स्काय लाईन’च्या (Urban Skyline) साईटला नक्की भेट द्या आणि क्षितीजाचं खरं सौंदर्य जवळून अनुभवा!!!

अधिक माहितीसाठी –

पत्ता – अर्बन स्कायलाईन

रावेत, पिंपरी-चिंचवड, पुणे.

संपर्क क्रमांक – +918956622511

ई-मेल – [email protected]

वेबसाईट – https://urbanspacecreators.com/

गुगल लोकेशन – https://goo.gl/maps/Et1QyVsH4zMcMuRs9

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.