Vadgaon Maval : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ अभियान

एमपीसी न्यूज – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Vadgaon Maval ) भाजपने ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ अभियान हाती घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ मधून यूट्यूब, ट्वीटर, फेसबुक,  व्हर्चुअल रॅलीच्या माध्यमातून सर्व बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या संवाद कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ अशा पद्धतीने बूथ प्रमुखांनी काम करण्यास सांगितले.

वडगाव पक्ष कार्यालयात स्क्रीन लावून वडगाव शहरातील सर्व बूथ प्रमुखांना हा कार्यक्रम दाखविण्यात आला. यावेळी सुमारे 50 बूथ प्रमुख उपस्थित होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, सरचिटणीस अविनाश बवरे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, युवा मोर्चा माजी अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, बाबुलाल गराडे, मधुकर वाघवले, तसेच वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे, महिला अध्यक्षा धनश्री भोंडवे, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे व सर्व नगरसेवक व बुथ प्रमुख कार्यकर्ते उपस्थित (Vadgaon Maval ) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.