Vadgaon Maval : वीजपुरवठा सुरळीत करण्याची राष्ट्रवादीची मागणी

एमपीसी न्यूज- वडगाव शहरात गेल्या पाच- सहा दिवसांपासुन वारंवार वीजपुरवठा खंडित होत असुन त्याचा शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.

याबाबतचे निवेदन वडगाव मावळ येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी वडगाव शहर अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र कुडे, कार्याध्यक्ष सुरेश जांभुळकर,नगरसेवक चंद्रजित वाघमारे,विशाल वहिले,राजेंद्र बाफना,भाऊसाहेब ढोरे,अतुल राऊत,सोमनाथ धोगडे,गणेश पं ढोरे,मंगेश खैरे,सतिश गाडे,संतोष जाधव,संतोष ढमाले,महेश तुमकर आदि जण उपस्थित होते. संपुर्ण वडगाव शहरातील वीजपुरवठा सुरळीत करावा व रात्रपाळीसाठी एक वायरमन द्यावा अशी मागणी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.