Vadgaon Maval : स्माईल किड्स प्रिस्कूलच्या वतीने आज दिवाळी मेळा

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील स्माईल किड्स प्रिस्कूलच्या वतीने आज, शनिवार (दि. 3) दिवाळी मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पंचमुखी मारुती मंदिर येथे सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत हा मेळा भरणार असून यामधे दिवाळीनिमित्त विविध प्रकारची खरेदी नागरिकांना करण्यात येणार आहे. महिलांसाठी साडी, ज्वेलरी, पर्स अनेक वस्तू खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत, तसेच लहान मुले व कुटुंबासाठी विविध प्रकारचे खाण्याचे स्टॉल लावण्यात आले आहेत. या दिवाळी मेळ्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अर्चना कुडे आणि प्रतीक्षा पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.