Vadgaon Maval : वडगावात ऑनलाईन, ऑफलाईन राष्ट्रवादी सभासद नोंदणी सुरू

एमपीसी न्यूज – वडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्राथमिक सदस्य नोंदणी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून सुरू आहे. याबाबत वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष राजेंद्र कुडे यांनी माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नोंदणी अभियान ऑफलाईन आणि ऑनलाईन देखील करावे असे आवाहन केले होते. त्यानुसार वडगावात ही नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे राजेंद्र कुडे म्हणाले.

वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्य नोंदणी बाबतीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दि 12 डिसेंबर 2021रोजी राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या संबोधनात जानेवारी 2022 पासून पारंपरिक पद्धतीने तसेच Online पध्दतीने सभासद नोंदणी बाबत सूचना केली होती.

त्यानुसार वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माध्यमातून आपणास Online पध्दतीने सभासद नोंदणी करण्यासाठी आपल्या जवळील अँड्रॉईड फोन वरून 7030120012 या क्रमांकावर मिस कॉल करावयाचा आहे त्यानंतर आपणास https://bit.ly/32Adf4G हि लिंक प्राप्त होईल त्यातील संपूर्ण माहिती भरून तसेच आवश्यक शुल्क भरून सभासदत्व प्राप्त करता येईल अथवा नगराध्यक्ष  मयुर ढोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्राथमिक सदस्य नोंदणी सकाळी 10 ते सांयकाळी 6 यावेळेत करता येईल तसेच आपले ओळखपत्र प्राप्त करून घेता येईल.

क्रियाशील सभासद होण्यासाठी दहा सर्वसाधारण सभासद करणे आवश्यक आहे.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार प्रचंड प्रमाणात सभासद नोंदणी करावी अशी विनंतीही शहराध्यक्ष कुडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.