Vadgaon Maval : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जासाठी 54 कोटींची तरतूद

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (Vadgaon Maval) मावळ तालुक्यातील शेतक-यांसाठी खरीप पीक कर्जासाठी सुमारे 54 कोटी रुपयांची तरतुद केली आहे. आतापर्यंत त्यातील 42 कोटी रुपयांचे वाटप पूर्ण केले असल्याचे सहकार महर्षी व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी सांगितले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा करते. गाव पातळीवरील शेती विकास सोसायट्याच्या मार्फत हा कर्ज पुरवठा होत असतो. यावर्षी मावळ तालुक्यातील 55 सहकारी सोसायट्याच्या मार्फत शेतकरी बांधवाना सुमारे 41 कोटी 49लाख रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले असल्याचे संचालक माऊली दाभाडे यांनी सांगितले.

मावळ तालुक्यातील शेतकरी हे प्रामुख्याने खरीप भातपिकांसाठी हा पीक कर्ज घेत असतो.त्यासाठी गाव पातळीवरील सहकारी संस्था संबंधित शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे तयार करून ती स्थानिक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेत मंजुरीसाठी दिली जातात. तालुक्यातील सर्व कर्ज प्रकरणे एकत्रीत करुन बॅंकेचे विभागीय अधिकारी ती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मुख्य कार्यालयात मंजुरीसाठी ठेवली जातात.सर्व प्रकरणाची छाननी होऊन त्याला संचालक मंडळ अंतिम मंजूरी देते.

यावर्षी बॅंकेचे विभागिय अधिकारी गुलाबराव खांदवे यांनी मावळ तालुक्यातील 55 शेती विकास सोसायट्याच्या शेतकर्‍यांसाठी सुमारे 53 कोटी 75 लाख रुपयांचा उद्दिष्ट आराखडा तयार करून तो बॅंकेकडून मंजूर करुन घेतला व त्याप्रमाणे 1 एप्रिल पासून प्रत्यक्ष वाटप सुरू केले.

मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना सोसायट्यांच्या सचिवांनी खरीप भातपीक (Vadgaon Maval) कर्ज वाटप केलेली असल्याचे मावळ तालुका सचिव संघटनेचे अध्यक्ष गणपतराव भानुसघरे यांनी सांगितले.

वेळेवर खरीप भातपिकासाठी कर्ज मिळाल्याने भात उत्पादक शेतकरी समाधानी असून भातपिकाच्या पेरणी पुर्वीची तयारी करुन तो मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत आहे.

Mp Shrirang Barne : एमआयडीसी ‘एसटीपी’ उभारणार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.