Vadgaon Maval : मनसे नगरसेविका सायली म्हाळसकर यांच्या ‘संपर्क अभियाना’स नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – नागरिकांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या (Vadgaon Maval) समस्या जाणून घेण्यासाठी घरोघरी भेट देत ‘संपर्क अभियान’ राबविले जात आहे. वडगाव नगरपंचायत प्रभाग क्रमांक 16 मनसेच्या नगरसेविका सायली रुपेश म्हाळसकर यांच्या या अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभागाच्या पुढील विकासासाठी नागरिकांचे विचार व संकल्पना जाणून घेतल्या जात असल्यामुळे अनेक चांगली मते यातून समोर येत आहेत.

या प्रसंगी तानाजी तोडकर, विकास साबळे, दिनेश म्हाळसकर, प्रणव म्हाळसकर, आदित्य म्हाळसकर, विक्रम कदम, महेंद्र शिंदे, पौरस डुकरे, संतोष म्हाळसकर आदीजण उपस्थित होते.

Pune : मास्टरमाइंड ग्लोबल इंग्लिश स्कूलचे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत घवघवीत यश

वडगाव नगरपंचायत हद्दतील प्रभाग क्रमांक – 16 मनसेच्या कार्यक्षम नगरसेविका (Vadgaon Maval) सायली रुपेश म्हाळसकर यांच्या वतीने प्रभागातील नागरिकांच्या समस्या व प्रश्न जाणून घेण्यासाठी नागरिक संपर्क अभियान राबवण्यात येत असून या अभियानादरम्यान नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांना दैनंदिन जीवनामध्ये भेडसावणाऱ्या समस्यांची विचारपूस करून त्याचे निरासरण केले जात आहे. तसेच, प्रभागाच्या पुढील विकासासाठी नागरिकांची विचार व संकल्पना जाणून घेतल्या जात असल्यामुळे या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.