Vadgaon News : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध काम करणे गरजेचे – आमदार शेळके

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील नागरिकांनी कोरोना संदर्भातील आरोग्य विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, योग्य ती दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, असे आवाहन मावळचे आमदार शेळके यांनी केले आहे.    

मावळ तालुका कोरोना सद्यस्थिती आढावा व प्रतिबंधात्मक नियोजन बैठक मावळ पंचायत समिती सभागृहात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध काम करण्याची गरज असून त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. प्रशासनाच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवून सज्ज राहिले पाहिजे. आरोग्य विभागाच्या व प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे योग्य पालन व्हावे यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी. कोविड लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवावी. लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सोयी सुविधा पुरवाव्यात अशा सूचना शेळके यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे,  अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय नाईक पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे, तालुका रराष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष बबन भेगडे, ज्येष्ठ नेते सुभाष जाधव, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, राजश्री राऊत, शिवसेना तालुकाध्यक्ष राजू खांडभोर, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, सुरेश निंबाळकर, लोणावळा अतिरिक्त मुख्याधिकारी भगवान खाडे, तसेच  प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, खाजगी डॉक्टर्स उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.