Vadgaon : भाजपच्या वतीने हर घर भाजपा अंतर्गत अटल आरोग्य अभियानाची सुरुवात

घरोघरी होणार प्रथमोपचार संचाचे विनामूल्य वितरण

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी वडगाव शहर यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ( Vadgaon )  वाढदिवसानिमित्त हर घर भाजपा अंतर्गत ‘अटल आरोग्य अभियान’ या घरोघरी प्रथमोपचार संच वाटप केले जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगण वडगांव मावळ येथे करण्यात आला.

मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रवींद्र भेगडे,भाजपा तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर,श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर, मा.उपसभापती, मा.नगरसेवक प्रवीण चव्हाण,शांताराम कदम, ज्येष्ठ नेते सोपानराव ढोरे, अरविंद पिंगळे, यदुनाथ चोरघे,बंडोपंत भेगडे, ॲड.तुकाराम काटे,नारायण ढोरे,दादा वाघवले,वडगांव नगरपंचायत

जैवविविधता समिती सदस्य सोमनाथ काळे, खंडूशेठ भिलारे, मा.सरपंच नितीन कुडे , संभाजीराव म्हाळसकर, सुधाकर ढोरे, मा.नगरसेवक, गटनेते दिनेश ढोरे, ॲड.विजय जाधव,प्रसाद पिंगळे, किरण म्हाळसकर,श्रीधर चव्हाण, शंकरराव भोंडवे, किरण भिलारे, गणेश भेगडे, दिलीप चव्हाण , वडगांव सोसायटी संचालक गणेश भालेकर ,अनुसूचित मोर्चा अध्यक्ष दीपक भालेराव,  योगेश म्हाळसकर, प्रशांत चव्हाण, हरीश दानवे आदी मान्यवर उपस्थित होते.

Pune : पुण्याचे सुपर पालकमंत्री होण्याची अजित दादांची इच्छा झाली पूर्ण!

भारतीय जनता पार्टी वडगांव शहराच्या पदाधिकारी,लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्या हस्ते वडगांव शहरातील प्रत्येक घरोघरी अटल आरोग्य अभियान –  प्रथमोपचार संचाचे विनामूल्य वाटप करण्यात येणार असून आज प्रातिनिधिक स्वरूपात या उपक्रमाचा शुभारंभ वडगांव शहरातील रिक्षा चालक बांधवांना प्रथमोपचार संच भेट देऊन

करण्यात आला.

पाच बँडेड पट्टी, कॉटन बँडेज, मेडिकल चिकटपट्टी,जखम निर्जंतुकी- करणासाठीची लिक्वीड बाटली, अंगदुखी, गुडघेदुखी यावरील मलम, भाजणे,कापणे आणि खरचटणे या वरील मलम, व्हॅसलीन, ओआरएस पावडर, कापूस आणि या वस्तू ठेवण्यासाठी ( Vadgaon ) पारदर्शक डबा व सोबत वरील वैद्यकीय वस्तूंचा वापर कसा करावा याबाबत माहिती तसेच लहान बालकांचा लसीकरण तक्ता, वडगांव शहरातील सर्व डॉक्टर्स, मेडिकल स्टोअर्स, रुग्णवाहिका, सर्पमित्र, पोलीस स्टेशन, महावितरण यांचे संपर्क क्रमांक असलेले माहितीपत्रक असे नागरिकांना अत्यंत उपयुक्त असे या संचाचे स्वरूप आहे

मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी आपल्या मनोगतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर भाजपा या उपक्रमाअंतर्गत सुरू झालेला हा उपक्रम पथदर्शी ( Vadgaon ) असल्याचे मत व्यक्त केले.

मावळ तालुका भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात अटल आरोग्य अभियान हा उपक्रम वडगांवकर नागरिकांना अत्यंत उपयुक्त ठरेल आणि नागरिक देखील प्रथमोपचार संचाचा योग्य वेळी निश्चित वापर करतील असे मत व्यक्त केले.

माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, ज्येष्ठ नेते यदुनाथ चोरघे यांनीही मनोगते व्यक्त केली. शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी प्रास्ताविक केले ज्यात त्यांनी या उपक्रमाची माहिती दिली आणि वडगांव शहर भाजपाच्या कार्याचा आढावा घेतला.

माजी नगरसेवक भूषण मुथा यांनी या प्रथमोपचार संचा मधील विविध वैद्यकीय वस्तूंची विस्तृत माहिती विशद केली. सूत्रसंचालन माजी नगरसेवक रवींद्र म्हाळसकर यांनी केले. आभार युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे ( Vadgaon ) यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.