Vadgaon Maval : अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगावमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पंचमुखी मारुती मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. ना नफा ना तोटा तत्वावर ५०% सवलतीच्या दरात १५००० रु.किमतीचा RO. ७५००/- रुपयात, नवीन मतदार नावनोंदणी अभियान आदी कार्यक्रम राबिण्यात आले.

याप्रसंगी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनरावजी भेगडे, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, मावळ तालुका युवक अध्यक्ष (ग्रामीण) कैलास गायकवाड, महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, युवक कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे, नगरसेवक चंद्रजित वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विशाल वहिले, प्रवीण ढोरे, ओबीसी सेल मावळ विधानसभा प्रभारी मंगेश खैरे, नवनाथ चोपडे, स्वामी गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक राजेंद्र कुडे, सुरेश जांभूळकर,राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष वडगाव शहर भाऊसाहेब ढोरे, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष अतुल राऊत, वडगाव शहर ओबीसी सेल अध्यक्ष अफताब सय्यद, सुहास विनोदे, भरत तुमकर आदींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.