Pune : समाविष्ट गावांमधील थकबाकी वसुली थांबवा – अजित पवार

एमपीसी न्यूज – समाविष्ट गावांमधील नागरिकांकडून ( Pune ) तिप्पट मिळकतकर आकारला जात आहे. थकबाकी सक्तीने वसूल केली जात आहे. यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेतला जाईपर्यंत महापालिकेने थकबाकी वसुली थांबवावी, असा आदेश उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि.3) महापालिका प्रशासनाला दिला.

समाविष्ट गावांमधील नागरिकांना मिळकतकर व दंडापोटीची रक्कम जादा आल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यातच अतिक्रमण कारवाईदेखील केली जात आहे. यामुळे 34  गावांमधील नागरिक व सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री पवार यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले.

Pune : तडीपार गुंडाला पिस्तूल व दोन काडतुसासह अटक

मिळकतकर थकबाकी, अतिक्रमण कारवाई, पाणी प्रश्न अशा विविध समस्यांचा नागरिकांनी पाढा वाचला. त्यावर पवार म्हणाले, ‘‘समाविष्ट गावांसह थकबाकीदार नागरिकांकडून सक्तीने मिळकतकर वसूल करणे, मालमत्ता जप्तीच्या तक्रारी नागरिक करत आहेत. अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत आमची बैठक होईल. त्यात धोरणात्मक निर्णय घेतला जाईपर्यंत आयुक्तांनी कारवाई थांबवावी.’’ यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार भीमराव तापकीर, सुनील टिंगरे, चेतन तुपे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदी उपस्थित ( Pune ) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.