Pune : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर उर्फ सुलोचना दीदी यांचं निधन

एमपीसी न्यूज : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर उर्फ सुलोचना दीदी यांचं (Pune ) निधन झालं आहे. त्या 94 वर्षांच्या होत्या.

Pune : बाबा रामदेव यांच्यासह पुणेकरांनी साधला ‌‘योग’

पद्मश्री तसंच महाराष्ट्र भूषणनं सन्मानित मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर चित्रपटातली आई म्हणून त्या ओळखल्या जात असत. दादर येथील खासगी रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुलोचना श्वसनाशी संबंधित संसर्गानं आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. भालजी पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे. मराठी बरोबर हिंदी चित्रपटांतही त्यांनी अनेक भूमिका केल्या.

1943 साली हिंदी चित्रपटसृष्टीत पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर राजकपूर शम्मी कपूर, शशी कपूर या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीबरोबरही त्यांनी काम केलं.

‘वहिनीच्या बांगड्या,’ ‘मीठ भाकर’ ‘मराठा तितुका मेळावा’ साधी माणसं, कटी पतंग हे त्यांचे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतले गाजलेले चित्रपट आहेत. सिनेमांमध्ये त्यांनी घरंदाज भूमिका साकारल्या होत्या. सुलोचनादीदींनी २५०हून अधिक मराठी तसच हिंदी सिनेमांत आपल्या अभियानाची छाप पाडली. त्यांचे अनेक सिनेमे गाजले.

सुलोचना दीदी म्हणून त्या सगळीकडे ओळखल्या जात. त्यांचा जन्म 30 जुलै 1928 ला झाला.

चित्रपटात आल्या तेव्हा त्यांची भाषा इतकी शुद्ध नव्हती. त्यांच्या बोलण्याची थट्टा व्हायची. म्हणून भालजी पेंढारकरांनी त्यांच्यासाठी एक संस्कृत मासिक लावलं.

ते वाचणं अतिशय क्लिष्ट काम होतं. मात्र त्याबद्दल अजिबात तक्रार न करता त्यांनी ती मासिकं वाचली आणि त्या भाषा दिव्यातून गेल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.