Alandi : फोर्ब्स मार्शल प्रा. लि.च्या वतीने इंद्रायणी घाटावर स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज – आळंदी येथील इंद्रायणी घाटावर दि.4 रोजी  फोर्ब्स मार्शल प्रा. लि. पिंपरी एमआयडीसी युनिट व सावरदरी  ता. खेड युनिट यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी नदी घाटावर खराटे, झाडूने साफसफाई करून कचरा गोळा करण्यात आला. त्या कचऱ्याची  विल्हेवाट लावण्यात आली.
स्थानिक वारकरी समाज बांधवास  स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.स्वच्छते विषयी प्रबोधन करण्यात आले.भविष्यात प्रदूषण मुक्तीसाठी कार्य करण्याची येथे हमी देण्यात आली.सार्वजनिक सोई सुविधा अभाव असल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नगरपालिका मुख्याधिकारी, आरोग्य विभाग, स्वच्छता कामगार यांच्या मार्फत सहकार्य लाभून सुविधा लाभल्या. व कार्यास मदत झाली. यावेळी सतीश जगधने, आनंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
नितीन अष्टेकर , भगीरथ पाठक, अविनाश छत्रे, नितीन ठाकरे, बिना जोशी , पुराणे व इतर मान्यवर सहकारी होते. याबाबत माहिती विठ्ठल शिंदे यांनी दिली.
https://youtu.be/s3EZk1wzMiw

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.