Pune : कलेचा जन्म फक्त आनंद देण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठीच झाला आहे – सुबोध भावे

कालापिनीच्या ४६ व्या वर्धापन दिनाचा समारोप संपन्न ...

एमपीसी न्यूज : कलेचा जन्म फक्त आनंद देण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठीच झाला आहे…असे मनोगत सुप्रसिद्ध अभिनेता,दिग्दर्शक ,निर्माता असलेल्या सुबोध भावे यांनी व्यक्त केले. कै.डॉ.शं.वा.परांजपे नाट्य संकुलात संपन्न झालेल्या कलापिनीच्या ४६ व्या वर्धापन दिनाच्या समारंभात घेण्यात आलेल्या मुलाखतीच्यावेळी व्यक्त केले.

Pune : बाबा रामदेव यांच्यासह पुणेकरांनी साधला ‌‘योग’

मान्यवरांच्या हस्ते झालेल्या दीप प्रज्वलनानंतर डॉ.अश्विनी परांजपे ,डॉ.प्राची पांडे,चांदणी पांडे,प्राची गुप्ते,आरती जाधव या गायिकांनी सादर  केलेल्या आणि दिनेश कुलकर्णी यांनी रचलेल्या व संपदा थिटे यांनी स्वरबद्ध केलेल्या कलापिनी गीताने सुदर प्रारंभ झालेल्या या समारंभात कट्यार काळजात घुसली. या सुबोध भावे यांच्या गाजलेल्या चित्रपटातील मन मंदिरा….या गीतावर शरयु पवनीकर, अनुजा झेंड, आदिती अरगडे, समा भावसार, तेजस्विनी गांधी यांनी बहारदार नृत्य सदर केले नृत्य रचना शरयूची होती.

कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे, कलापिनीचे जेष्ठ कलाकार आप्पा तथा प्रभाकर तुंगार, पुण्यातील आपलं घर संस्थेचे अनाथांचे नाथ असलेले मा.विजय फळणीकर,कलापिनीचे अध्यक्ष मा.विनायक अभ्यंकर, अ.भा.म.नाट्य परिषदेचे शाखेचे अध्यक्ष मा.सुरेश धोत्रे,कलापिनीच्या कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे हे मान्यवर मंचावर उपस्थित होते.

मा.विजय फळणीकर यांचा त्यांच्या अनाथांच्या साठी केलेल्या कार्याबद्दल तर मा.आप्पा तुंगार यांचा ८५ व्या वर्षातील पदार्पणाबद्दल,सौ.अनघा बारसे यांचा ७२ व्या वाढदिवस बद्दल  आणि मा.सुरेश धोत्रे यांच्या अ.भा.म.नाट्य परिषदेच्या मुंबईच्या नियामक मंडळावरील नियुक्ती बद्दल गौरव करण्यात आला. या नंतर सुबोध भावे यांच्या हस्ते कलापिनीच्या कलाकार व कार्यकर्ते यांना विविध पुरस्कारांनी गोरविण्यात आले.

डॉ.मीनल कुलकर्णी यांचा संगीताचार्य पदवी बद्दल विशेष गौरव करण्यात आला. ऋषिकेश कठाडे, नमन शिरोडकर (धडपड पुरस्कार), अदिती अरगडे(आश्वासक पदार्पण), स्वच्छंद (पडद्यामागील कामगिरी), अविनाश शिंदे(चतुरस्र कलाकार), संदीप मनवरे(अष्टपैलू कलाकार), चैतन्य जोशी(बहुविध उत्कृष्ट कलाकार), सायली रौंधळ(सर्वोत्कृष्ट अभिनेत्री) आणि या वर्षीचा कै.हेमंत तुंगार स्मृती युवा गौरव पुरस्कार कलापिनीचा अष्टपैलू कलाकार शार्दूल गद्रे याला देण्यात आला.

या नंतर डॉ.विनया केसकर आणि चेतन पंडित यांनी सुबोध भावे यांची रंगतदार मुलाखत घेतली. सुबोध भावे यांची रंगलेली मुलखात ही कलापिनीच्या कलाकारांसाठी,तळेगावच्या रसिकांसाठी एक कार्यशाळाच होती. एका मनस्वी कलाकाराची स्पष्ट आणि परखड मते विचार करायला लावणारी होती..रसिकाची दाद मिळवणारी होती… भरलेले वातावरण,रास्कांचा उत्कट प्रतिसाद आणि नितांत सुंदर अनुभूती देणारी मुलाखत तळेगावकरांच्या कायम लक्षात राहणारी होती. कै.विजय तेंडूलकर आणि चतुरस्त्र अभिनेता सतीश तारे हे माझे आदर्श आहेत  असे सांगून त्यांच्या नावाने पुढील प्रत्येक वर्षी प्रत्येकी रु.५०००/- (रु.पाच हजार) ची पारितोषिके कलापिनीच्या कलाकारांसाठी देण्याचे सुबोध भावे यांनी जाहीर केले.

या कार्यक्रमासाठी मा.नगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी,उद्योजक मा.चंद्रकांत भिडे आणि मोठ्या संख्येने मावळ परिसरातील तसेच पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरातील रसिक आवर्जून उपस्थित होते.

या सुंदर कार्यक्रमाचा समारोप पठणं विपुलं देही…या संपदा थिटे यांनी गायिलेल्या श्लोकाने झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत डॉ.अनंत परांजपे यांनी केले तर आभार प्रदर्शन कलापिनीच्या कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांनी केले आकर्षक रंगमंच सजावट विराज सवाईआणि सहकारी  तर ध्वनी संयोजन प्रतिक मेहता आणि सहकारी प्रदर्शन मांडणी चैतन्य जोशी आणि सहकारी तर अतिशय समर्पक अशी रांगोळी महिला मंचच्या दिपाली जोशी,सुप्रिया खानोलकर आणि सहकाऱ्यांनी काढली होती.

इतर व्यवस्थेत रश्मीताई पांढरे, लीना परगी, राखी भालेराव आणि भाग्यश्री हरहरे, अनघा बुरसे, मधुवंती रानडे, दीप्ती आठवले ,शुभांगी देशपांडे, रामचंद्र रानडे, श्रीपाद बुरसे यांचा सहभाग होता.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.