Nitin Desai : सुबोध भावे, सोनाली कुलकर्णीसह आशुतोष गोवारीकर, आमिर खान यांनी नितीन देसाई यांना दिला शेवटचा निरोप

एमपीसी न्यूज : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. कर्जत येथील स्टुडिओत त्यांनी आत्महत्या केली. नितीन देसाई यांच्या निधनाने इंडस्ट्रीतील सर्वांनाच मोठा धक्का बसला. आज त्यांच्या पार्थिवावर कर्जत येथेच अंतिम संस्कार करण्यात आले. तर त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यापासून दिग्गज कलाकार, दिग्दर्शकही पोहचले. सर्वानी त्यांना जड अंतकरणाने शेवटचा निरोप दिला.

नितीन देसाई यांचे पार्थिव दिवाण-ए-आम नावाच्या स्टुडिओमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांची पत्नी नयना देसाई आणि मुले तसेच इतर नातेवाईक हजर होते.

Nigdi : मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची पावसाळी अधिवेशनास उपस्थिती

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या मुंबईतील सर जेजे रुग्णालयाच्या शवागाराला भेट दिली, जिथे देसाई यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता.

तर यावेळी मराठी कलाकार सुबोध भावे, मानसी नाईक, सोनाली कुलकर्णी तर हिंदी सिनेसृष्टीतील आशुतोष गोवारीकर,मुकेश ऋषी, आमिर खान, संजय लीला भन्साळी यांनी नितीन देसाई (Nitin Desai) यांना शेवटचा निरोप दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.