Chinchwad : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान वर्षांत दुसऱ्यांदा आला मित्राच्या भेटीला

एमपीसी न्यूज – बॉलीवूड मध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख (Chinchwad )असलेला आमिर खान मागील वर्षभरात दोन वेळा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात आला. त्याला कारण देखील तेवढेच खास होते. आमिर खान याच्या मित्रावर सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची जबाबदारी असून मित्राचे काम बघण्यासाठी तो खास आयुक्त कार्यालयात आला होता.

सोमवारी (दि. 26) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयास प्रसिद्ध (Chinchwad )अभिनेता आणि पाणी फाऊंडेशनचा संस्थापक आमिर खान याने  भेट दिली. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून राबवला जात असलेल्या दिशा उपक्रमाची माहिती घेत त्या उपक्रमाचे त्याने तोंडभरून कौतुक केले. स्वतः आमिर खान आल्याची माहिती समजताच आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी गर्दी केली.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या उपक्रमाचे कौतुक

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून झोपडपट्टी परिसरातील तरुणांसाठी ‘दिशा’ हा उपक्रम राबवला जात आहे. शिक्षणाचा अभाव, व्यसनाधीनता, वर्चस्ववाद, मोबाईलचा वापर आणि गुन्हेगारीची क्रेझ यामुळे झोपडपट्टी परिसरातील मुले गुन्हेगारीकडे वळली जातात. त्यांना योग्य वयात योग्य संधी मिळाली तर त्यांच्या हातून चांगले काम होऊ शकेल, अशा विश्वासाने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिशा उपक्रम सुरु केला आहे.

पोलिसांनी शहरातील 75 झोपडपट्ट्यांमधून 38 फुटबॉल टीम बनवल्या आहेत. त्यांचा दररोज सराव घेतला जात आहे. स्वतः पोलीस आपला सराव घेत असल्याने मुले देखील या उपक्रमात हिरीरीने सहभागी होत आहेत. अनेक संघांनी विविध स्तरावरील स्पर्धांमध्ये बक्षिसे देखील मिळवली आहेत. पोलिसांकडून राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाला खऱ्या अर्थाने दिशा मिळत आहे, हे जाणून आमिर खान आणि दिग्दर्शक, निर्माती असलेली किरण राव यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे कौतुक केले.

https://x.com/PCcityPolice/status/1762180642073096442?s=20


ही मुंबईची दोस्तीमिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या अभिनेता आमिर खान याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात येऊन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची भेट घेतली. अभिनेता आमिर खान आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे मित्र असून आमिर खान खास मित्राला भेटण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आला.

चक्क आमिर खान समोर दिसताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आमिर खान याने अनेक चित्रपटांमधून पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. अभिनयातून त्याने पोलिसांची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पोलिसही त्याचे चाहते आहेत.

Talegaon Dabhade : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे मुंबई येथे कार्यरत होते. त्यावेळी आमिर खान आणि पोलीस आयुक्त चौबे यांची ओळख झाली. त्या ओळखीतून आमिर याने मित्र म्हणून पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांची पिंपरी-चिंचवड येथे 12 मार्च 2023 रोजी पहिल्यांदा भेट घेतली. त्यानंतर 26 फेब्रुवारी 2024 रोजी पुन्हा एकदा बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट मित्राला भेटण्यासाठी आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.