Nitin Desai : नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी प्रसिद्ध फायनान्स कंपनीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील रायगड पोलिसांनी शुक्रवारी प्रसिद्ध एडलवाइज ग्रुपचे अध्यक्ष रेशेश शहा यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे खालापूर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत प्रथम माहिती अहवाल नोंदवण्यात आला आहे.

एफआयआरनुसार एडलवाइजचे चेअरमन रेशेश शाह यांच्यासह कंपनीचे अधिकारी स्मित शाह, केयूर मेहता, एडलवाइज अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचे आर के बन्सल आणि एनसीएलटीने अंतरिम रिझोल्यूशन प्रोफेशनल म्हणून नियुक्त केलेले जितेंद्र कोठारी यांच्यवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेहा देसाई यांनी केलेल्या आरोपांनुसार, देसाई यांची कंपनी ND’s Art World Pvt Ltd ने 2016 आणि 2018 मध्ये ECL फायनान्सकडून (ECL फायनान्स ही एडलवाइज समूहाची नॉन-बँकिंग फायनान्स शाखा आहे.) दोन कर्जाद्वारे 185 कोटी रुपये घेतले होते.

Bhosari Crime : चोरांना पकडण्यासाठी 150 हुन अधिक तपासले सीसीटीव्ही फुटेज; अखेर 2 चोर अटकेत

त्यांच्या कंपनीने कर्जदारांना 252 कोटी (Nitin Desai) रुपयांच्या कर्जाची परतफेड बाकी होती. परंतु, 2020 पासून या कंपनीने परतफेडीसाठी मानसिक त्रास दिला आणि यातून नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

एवढेच नव्हे, तर नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या 11 ऑडिओ क्लिप पोलिसांना मिळाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे त्या लोकांची नावे आहेत जे त्यांना त्रास देत होते. पोलिसांनी हा ऑडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला होता.


पार्टी करून गाडी चालवणे पडणार महागात.

एमपीसी न्यूज यूट्यूब चैनल ला नक्की सबस्क्राईब करा!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.