Nitin Desai : नितीन देसाई यांच्या डोक्यावर होतं तब्बल 250 कोटींचं कर्ज

स्टुडिओवर होणार होती जप्तीची कारवाई

एमपीसी न्यूज : सिनेसृष्टीत कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांचा नावलौकिक होता. मोठे सेट म्हंटलं की त्यांचंच नाव पुढे असायचं. पण असं सर्व असताना त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. कर्जाची रक्कम फेडणं अशक्य होते. आर्थिक विवंचना असल्याने त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

PCMC : ‘मेरी माती मेरा देश’ अभियानासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती

एकूण 250 कोटी रुपयांचं कर्ज असल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी एका कंपनीकडून 180 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. कर्जाची रक्कम आणि व्याज धरून एकूण रक्कम 250  कोटी रुपयांच्या घरात गेली होती. त्यामुळे ते चिंतेत होते, असं प्राथमिक तपासात पोलिसांना माहिती मिळाली आहे. त्यांच्या पश्चात आता 250 कोटी रुपयांची कर्जाची रक्कम कोण फेडणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

देसाई यांच्यावर कोट्यवधींचं कर्ज होतं असं सूत्रांकडून समजतंय. आर्थिक संकट हे त्यांच्या आत्महत्येमागचं मुख्य कारण असल्याचं म्हटलं गेले आहे. रात्री खोलीत गेलेले देसाई हे सकाळी बाहेर आलेच नाहीत असं त्यांच्या स्टुडिओमधील स्टाफने सांगितलं. त्यांचा मृतदेह त्यांच्या खोलीत दोरीला लटकलेला आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला.

नितीन देसाई यांनी सीएफएम या वित्तीय कंपनीकडून १८० कोटी घेतले होते. या साठी त्यांनी त्यांच्या तीन मालमत्ता तारण ठेवल्या होत्या. दरम्यान, काही दिवसानंतर सीएफएम संस्थेने त्यांची सर्व कर्ज खाते हे एडलवाइस ॲसेट रिकंस्ट्रक्शन कंपनीला दिली होती. नितीन देसाई यांच्या कडील कर्जाची वसुली होत नसल्याने त्यांनी देसाई यांना वेळोवेळी संपर्क साधला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.