PCMC : ‘मेरी माती मेरा देश’ अभियानासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती

एमपीसी न्यूज –  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मार्फत केंद्र सरकारच्या सूचनेनुसार “मेरी माती-मेरा देश” हा उपक्रम राबविला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ITI : महापालिकेच्या मोरवाडी आयटीआय 37 जणांना प्रशिक्षणाची संधी  

देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत 9 ते 30 ऑगस्ट 2023 या कालावधीत “मेरी माती-मेरा देश” हा उपक्रम राबविला जाणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सकारात्मकता, देशभक्ती, स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांप्रती कृतज्ञतेचा उत्सव साजरा करणे आहे.

“मेरी माती-मेरा देश” या राष्ट्रीय उपक्रमासाठी महापालिका स्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करण्याच्या केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नोडल अधिकारी म्हणून उपायुक्त दंडवते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.