Vishrantwadi : सायबर चोरट्यांनी ऑनलाइन टास्कच्या आमिषाने तरुणीची केली 32 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज –   सायबर चोरट्यांनी ऑनलाइन टास्कच्या आमिषाने तरुणीसह ( Vishrantwadi ) दोघांची 32 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chinchwad : चौघडा परंपरेचे जतन व वारसा वृद्धिंगत करणाऱ्या पाचंगेंचे काम दीपस्तंभासारखे

तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी संदेश पाठविला होता. घरातून काम करण्याची संधी उपलब्ध, असे संदेशात म्हटले होते. समाजमाध्यमातील मजकूर, ध्वनिचित्रफितीस दर्शक पसंती (व्हयुज) मिळवून दिल्यास चांगले पैसे मिळतात, असे सांगून तरुणीला जाळ्यात ओढले. सुरुवातीला तरुणीला चोरट्यांनी काही पैसे दिले.

त्यानंतर या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून चोरट्यांनी तिच्याकडून वेळोवेळी 13 लाख 27 हजार रुपये घेतले. त्यानंतर चोरट्यांनी तरुणीला परतावा दिला ( Vishrantwadi ) नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ढवळे तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.