Today’s Horoscope 22 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 22 August 2023  – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – मंगळवार.

22.08.2023.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष- श्रीयाळ षष्ठी.

राहू काळ – दुपारी 3.00 ते 04.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.  आजचे नक्षत्र – चित्रा 06.32 पर्यंत नंतर स्वाती.

चंद्र राशी – तुळ.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- राखाडी )

आज तुमच्या कामातील उत्साह पाहून तुमचे विरोधकही प्रभावित होतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. वैवाहिक जोडीदाराशी आज तुमचे चांगले सुर जुळतील.

वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुमची तब्येत थोडी नरम राहील. काही जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. काही येणी असतील तर ती अनपेक्षित पणे वसूल होऊ शकतील. आज प्रवासात जरा सावध राहा.

मिथुन ( शुभ रंग- हिरवा )

एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल. कलेच्या क्षेत्रात नवोदितांना उत्तम संधी चालून येतील.

कर्क (शुभ रंग- पांढरा)

शालेय उपयोगी वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. कलाकारांना यश सोपे नाही. स्ट्रगल वाढवावी लागणार आहे. गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही.

सिंह (शुभ रंग- मरून)

कार्यालयीन कामानिमित्त प्रवास घडतील. बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आईच्या तब्येतीची विचारपूस नक्की करा.

कन्या ( शुभ रंग- भगवा)

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात इतरांना अशक्य असलेले तुम्ही शक्य करून दाखवाल. आज वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही तुम्ही आपलेसे कराल.

तूळ ( शुभ रंग- पिस्ता )

कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठांनी सोपवलेल्या वाढीव जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आज महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या.

वृश्चिक (शुभ रंग- सोनेरी)

आज घरात वडीलधाऱ्यांचे मूड सांभाळावे लागणार आहेत. कोणतेही आर्थिक व्यवहार सावधपणे करायला हवेत. दूरच्या प्रवासात बेसावध राहून चालणार नाही.

धनु- (शुभ रंग- डाळिंबी )

आज काही मनाजोगत्या घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आज दिवस आनंदात जाईल.

मकर ( शुभ रंग- डाळिंबी)

नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळायला हवा. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांना पुरेसा वेळ देणे जमणार नाही.

कुंभ (शुभ रंग – मोरपंखी )

नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली करा. आत्मविश्वासाचा अतिरेक नुकसानास कारणीभूत ठरू शकेल. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडून देऊ नये.

मीन -(शुभ रंग – मोरपंखी )

कोणतेही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. व्यवसायात भागीदारांशी मतभेद संभवतात वैवाहिक जीवनात लाडिक रुसवे फुगवे असतीलच

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.