Chinchwad : चौघडा परंपरेचे जतन व वारसा वृद्धिंगत करणाऱ्या पाचंगेंचे काम दीपस्तंभासारखे

एमपीसी न्यूज : लोककलेमधील समृद्ध परंपरा (Chinchwad) असलेल्या ‘चौघडा’ या पारंपरिक कलेचे जतन करत तो वारसा टिकवणा-या पाचंगे परिवाराचे काम दीपस्तंभासारखे आहे अशी भावना डॉ डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी.पाटील यांनी आज व्यक्त केली.

येथील चौघडा सम्राट दत्तोबा पाचंगे यांच्या सहस्त्रचंद्र वर्षानिमित्त व त्यांचे पुत्र रमेश पाचंगे यांच्या एकसष्टी निमित्त त्यांचा गौरव व मानपत्र प्रदान सोहळा नुकताच पार पडला. कासारवाडी येथील आई माताजी वडेर मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, आमदार रविंद्र धंगेकर, अभिनेत्री जयमाला इनामदार, बालगंधर्वच्या नातसून अनुराधा राजहंस, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तॄपती देसाई, नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कृष्णनाम महाराज, हभप राघव चैतन्य बाबा काटे महाराज, संयोजक पत्रकार विजय जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

Pune : तीनपत्ती खेळण्यासाठी “तो” करायचा घरफोडी मात्र अखेर लागला पोलिसांच्या हाती

यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ श्रीपाल सबनीस यांनी अभिजनाकडून बहुजनांकडे आलेली ही परंपरा पाचंगे परिवाराने जतन करणे हा ऐतिहासिक क्षण असून त्यांच्या कार्याचे (Chinchwad) दस्तावेजीकरण होऊन शासनाने त्यांना पद्मश्री द्यायला हवी असे त्यांनी म्हटले.

आमदार धंगेकर, भोईर, अनुराधा राजहंस, राघव चैतन्य बाबा महाराज, आदींची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमापूर्वी शाहीर गुरूप्रसाद नानिवडेकर यांचा स्वर भाव तरंग हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय बोत्रे पाटील यांनी तर स्वागत पर मनोगत सुधीर कुमार अग्रवाल यांनी केले. प्रबोधनकार शारदा  मुंडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.