Pimpri : आयुक्तांचा आमदारांसमवेत पिंपरीतील प्रश्नांसाठी झंझावती दौरा

एमपीसी न्यूज  – पिंपरीतील स्मशानभूमी, पत्राशेड, मिलिंदनगरचे रखडलेले पुनर्वसन, काळेवाडी ते सुभाषनगर हा नियोजित उड्डाणपूल आदी रखडलेल्या कामांची पाहणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरीचे आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या समवेत केली.

पालिका प्रशासन झोपडपट्टीवासिायांच्या प्रश्नांकडे चालढकल करत असल्याबद्दल आमदार चाबुकस्वार यांनी आयुक्तांबरोबर मागील पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत परखड शब्दात नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आज आयुक्तांनी पिंपरीतील प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी समक्ष पाहणी करण्याचे निश्चित केले होते. सहशहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, नगरसेवविका निकिता कदम शिवसेनेचे विभागप्रमुख अनिल पारचा आदी या दौऱ्यात सहभागी झाले होते.

यावेळी आयुक्तांनी तातडीने मिलिंदनगर मधील तयार झालेल्या दोन इमारतींचे वाटप लाभार्थींना देणे, स्वच्छतेविषयक कामे करणे, पिंपरी, मिलिंदनगर टप्पा क्र. 1 लगत (नाल्यालगत) असलेले पत्राशेड्स व टपऱ्या निष्कासित करणे, पिंपरी मिलिंदनगर पुनर्वसन गृहप्रकल्पाच्या मंजुर रेखांकनातील 9 मी, रूंद रस्त्यामधील झोपडयामधील नागरिकांचे झोनिपु विभागाकडून पात्र – अपात्र निर्णय झाल्यानंतर लाभार्थाचे इमारत A-2 किंवा A-3 मध्ये निवासी गाळा हस्तांतरीत झाल्यानंतर जागेवरील झोपडया निष्कासित करणे,  रेखाकंनातील जागा क्र. 2 मधील रेशनिंग दुकान व समोरील झोपडया काढून टाकण्यात याव्यात, इमारत A-11 लगतच्या त्रिकोणी जागा स्वच्छ राहणेकामी तेथे क्राँक्रीट करणे, इमारतीमधील A-2 व A-3 पाण्याच्या टाकीलगत (अंडरग्राऊंड वॉटरटँक) क्षेत्रावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे,प्रकल्पातील उर्वरित 6 इमारतीचे बांधकामाबाबत मे. एम. एम. कन्स्लंट यांना उर्वरित इमारतीच्या विकासकामी दाखवावी. (मंजुर रेखांकन व जागा), सुभाषनगर येथील झोपडीवरील अँगलचे काम काढून टाकावे, मिलिंदनगर प्रकल्पासमोरील 18 मी. रूंद डीपी रोडचे Minor Modification प्रस्ताव नगर रचना विभागामार्फत करणे, 18 मी. रूंद डी.पी. रोड मधील अतिक्रमणे निष्कासित करणे, ट्रानजिंट कॅम्प मधील उर्वरित पत्राशेडस्‍ कार्यवाही निष्कासन कारवाई करणे, दापोडी येथील महात्मा फुलेनगर रस्त्यामध्ये येणाऱ्या झोपडयाचे पात्र-अपात्र सर्व्हे करून रस्ता विकसित करणे. या कामांबद्दल आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.