Wakad : सोसायटीमध्ये कार वॉशिंगचे काम देण्यावरून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – सोसायटीमध्ये कार वॉशचे काम देण्यावरून एकाला रस्त्यात अडवून टोळक्याने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 11) सकाळी आठच्या सुमारास गोल्ड फिंगर सोसायटी जवळ वाकड येथे घडली.

मनोज देऊ परब ( वय 36, रा. रॉयल इनट्राडा सोसायटी, भूमकर चौक, वाकड ) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना फिर्यादी यांच्या सोसायटी मधील कार वॉशिंगचे काम घ्यायचे होते. मात्र ते काम त्यांना मिळाले नाही. त्या रागातून आरोपींनी फिर्यादी परब मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास कार मधून (एम एच 14 / एच डी 1184) जात असताना रस्त्यात अडवले. त्यांच्यासोबत आरोपींनी शाब्दिक वाद घातला. त्यानंतर लोखंडी बारने परब यांच्या हातावर मारले. तसेच त्यांच्या पायावर हॉकी स्टिकने मारले. यामध्ये परब गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर आरोपींनी परब यांच्या सोसायटीत राहणारे सौमक नावाच्या व्यक्तीला देखील मारण्याची धमकी देत आरडाओरडा केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.