Chakan : घरफोडी करून एक लाखाचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – बंद घराचा दरवाजा उचकटून घरातून सोन्याचे दागिने, टीव्ही, रोख रक्कम व महत्वाची कागदपत्रे असा 1 लाख 3 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना नामदेवनगर चाकण येथे घडली.

अशोक पोपट गोरे (वय 31, रा. सोहम पॅराडाईज, नामदेवनगर, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोरे हे नोकरी करतात. शनिवारी (दि. 8) सकाळी आठच्या सुमारास नोकरीनिमित्त घराबाहेर पडले. दरम्यान त्यांच्या बंद घराचा दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरटयांनी घरात प्रवेश केला. चोरटयांनी घरातील सोन्याचे दागिने, टीव्ही, रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे असा एकूण 1 लाख 3 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. गोरे दुपारी दोनच्या सुमारास घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.