Vadgaon Maval : मावळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मुकुंद तनपुरे

एमपीसी न्यूज- मावळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मुकुंद तनपुरे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. पी कोतकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विशेष सभेत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

यावेळी नगरसेवक किशोर भेगडे, राकेश घारे, विशाल वाहिले, दिलीप राक्षे, अंकुश ढोरे, शोभाताई वहिले, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश पवार, गटविकास अधिकारी-शरदचंद्र माळी, गट शिक्षण अधिकारी मंगल वाव्हळ, तळेगाव प्रशासन अधिकारी संपत गावडे, विस्तार अधिकारी-मोमिन, जि.प.विस्तार अधिकारी निलेश धानापुने, पुणे सहा.प्रशासन अधिकारी शिवाजी आढाळगे, विस्तार अधिकारी भैरवनाथ टिळेकर तसेच सर्व संचालक शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी व तालुक्यातील मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते..

_MPC_DIR_MPU_II

संस्थेच्या उन्नतीसाठी आगामी काळात प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष मुकुंद तनपुरे यांनी सांगितले. उमेश माळी यांनी सूञसंचालन केले तर आण्णासाहेब ओहोळ यांनी आभार मानले.

,

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1