Vadgaon Maval News : मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

पतसंस्थेच्या उत्तम कामगिरीबाबत आमदार सुनील शेळके यांच्याकडून कौतुक

एमपीसी न्यूज –  मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 91 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच ऑनलाईन माध्यमातून संपन्न झाली. पतसंस्थेच्या विविध उपक्रम, हितकारक धोरणाबाबत आमदार सुनील शेळके यांनी पतसंस्थेचे कौतुक केले. पतसंस्थेच्या सभासदांसाठी लाभांश, व्याजदर यासह विविध योजनांबाबत सर्व पदाधिका-यांनी स्वागत केले.

मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 91 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन दिपककुमार बबनराव मेमाणे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन व्हिडीओ कान्फरसिंग ॲपद्वारे नुकतीच संपन्न झाली.

सदर सभेस मावळ विधानसभेचे आमदार सुनिल शेळके, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्हा.चेअरमन अर्चना घारे, पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर, तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक किशोर भेगडे, मावळ पंचायत समिती सभापती ज्योति शिंदे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, वडगांव नगरपंचायत उपनगराध्यक्षा पुजा वहिले, वडगाव नगरपंचायतीच्या नगरसेविका पुनम जाधव, तळेगांव नगरपरिषदेचे शिक्षण समितीचे माजी सभापती ब्रिजेंद्र किल्लावाला, वडगांवचे माजी उपसरपंच विशाल वहिले, गटविकास अधिकारी सुधिर भागवत, गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे, विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज, कांचन धोत्रे उपस्थित होते.

आमदार शेळके यांनी संचालक मंडळाने संस्थेचा व्याजदर कमी करुन सर्व सभासदांचे हित जोपासल्या बददल संचालक मंडळाचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच पंचायत समिती सभापती ज्योति शिंदे तसेच वडगांव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा पुजा वहिले यांनी पतसंस्थेला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांनी सलग सहा वर्षे दोन अंकी लांभांश दिल्याबददल संचालक मंडळाचे कौतुक केले, माजी उपसभापती शांताराम कदम यांनी पारदर्शक कारभाराबददल संचालक मंडळाचे कौतुक केले. त्याचप्रमाणे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकरयांनी पतसंस्थेचे थकबाकीदार कमी केल्याबददल संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

पतसंस्थेच्या सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय सभेत घेण्यात आले. त्यामध्ये मासिक वर्गणीमध्ये सलग दुस-या वर्षी कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. सभासदांच्या कर्जावरील व्याजाचा दर हा 9.50 टक्के वरुन 9 टक्के करण्यात आला. संजीवनी योजनेद्वारे मयत कर्जदार सभासदास 15 लाखा पर्यंतचे कर्ज माफ तसेच बिगर कर्जदार सभासद असल्यास त्यांच्या वारसास रुपये 7 लाख 50 हजार मदत तसेच डी.सी.पी.एस.धारकांसाठी 01 लाखाची अतिरिक्त मदत देण्याचे ठरविण्यात आले. अशी माहीती पतसंस्थेचे चेअरमन दिपककुमार मेमाणे यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आनलाईन पध्दतीने आयोजित केलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुतांशी सभासदांनी आपल्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया नोंदविल्या महिला सभासदांनीही उत्स्फुर्तपणे आपला सहभाग नोंदविला विद्यमान कार्यकारी संचालक मंडळाच्या पारदर्शक व काटकसरीच्या कारभारामुळे 01 कोटी 68 लाख 56 हजार 254 रुपये एवढा नफा झाला सभासदांना विक्रमी 10.20 टक्के एवढा लाभांश मिळाल्याने सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यकाळामध्ये 10 .10 टक्के 10.20 टक्के 10.30 टक्के 11.50 टक्के आणि आता 10.20 टक्के असा इतिहासात प्रथमच सलग पाच वर्षे दोन अंकी लाभांश वाटप करण्यात आला. संचालक मंडळाने पतसंस्थेला 01 रुपयाही खर्च येऊ न देता संस्थेच्या कार्यालयात अद्ययावत फर्निचर बनवून पतसंस्थेचे कार्यालय वायफाय बसवून हायटेक केले आहे. सर्व सभासदांच्या सोयीसाठी संगणीकृत पासबुक सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तसेच सभासदांना आपल्या खात्यावरील शिल्लकीची माहिती एस. एम. एस. सुविधेद्वारे दिली जाते. सभासद हिताची अनेक कामे संचालक मंडळाने मार्गी लावली आहेत.

सदर ऑनलाईन सभेसाठी संस्थेच्या कार्यालयात समक्ष पतसंस्थेचे चेअरमन दिपककुमार मेमाणे, व्हा.चेअरमन सुमित नळे, कार्यकारी संचालक राहुल लंबाते, संचालक आण्णासाहेब ओहोळ, संदिप कांबळे, कल्याणी रासकर, अमोल चव्हाण, राजू लोंढे, प्रमोद भोईर, अनिल कळसकर, नारायण कांबळे, हरिभाऊ आडकर, मुकुंद तनपुरे, शोभा वहिले, सुहास धस, जालींदर कांबळे, संतोष पन्हाळे, संतोष भारती, तृप्ती गाडीलकर, तज्ञ संचालक माया कुटे, खंडू शिंदे तसेच तालुक्यातील कार्यरत सर्व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सभेचे प्रस्ताविक संस्थेचे व्हा.चेअरमन सुमित नळे यांनी केले अहवाल वाचन कार्य संचालक राहुल लंबाते यांनी केले. आभार चेअरमन दिपककुमार मेमाणे यांनी मानले. सुत्रसंचालन संस्थेचे विदयमान संचालक प्रमोद भोईर, मुकुंद तनपुरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.