Vadgaon Maval : मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी दीपककुमार मेमाणे यांची निवड

एमपीसी न्यूज :  मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचाणे ता. मावळ येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत व देहुगावचे रहिवासी असणारे दीपककुमार बबनराव मेमाणे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.

या प्रसंगी शिक्षक नेत्या श्रीमती शोभा वहिले, सुहास विटे, बाबासाहेब औटी,   शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नारायण कांबळे, संदीप औटी, बाळासाहेब शिंगाडे, अनिल कळसकर, प्रमोद भोईर, राहूल जाधव, राहूल लंबाते, अण्णासाहेब ओहोळ, दत्तात्रय भालेराव, अजित मोरे, विष्णू मोरे, आदि शिक्षक उपस्थित होते.

मेमाणे यांना यापूर्वी पंचायत समिती, मावळ यांनी व तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांनी गुणवंत शिक्षक म्हणून गौरविलेले आहे.

शिक्षक पतसंस्था अधिकाधिक कार्यक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करणार असून शिक्षक सभासदांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे  मेमाणे यांनी  निवडीनंतर सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.