Dehuroad News : तळवडे तरुणावर खूनी हल्ला

एमपीसी न्यूज – ज्योतिबा नगर तळवडे येथे मोकळ्या माळरानात एका अनोळखी तरुणावर खूनी हल्ला झाला. ही घटना शनिवारी (दि. 17) सायंकाळी घडली.

पोलीस नाईक आजिनाथ विठ्ठल सावंत यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी तरुणावर शनिवारी सायंकाळी तळवडे मधील ज्योतिबानगर येथे एका माळरानात अज्ञातांनी धारदार हत्याराने डोक्यात, तोंडावर, चेहऱ्यावर, हातावर मारून ठार मारण्याप्रयत्न केला. जखमी तरुणाची अद्याप ओळख पटली नाही. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.