Alandi News : तिकीट बुकिंग ऑफिस मध्ये 8 महिन्याच्या चिमुकलीचा झोपून आई निघून गेली

एमपीसी न्यूज – बस तिकीट बुकिंगच्या ऑफिस मध्ये 8 महिन्याच्या चिमुकलीला झोपवून आई निघून गेली. हा दुर्दैवी प्रकार गुरुवारी (दि. 15) दुपारी साडेबारा वाजता आळंदी गावातील चाकण चौकात असलेल्या खुशाल ट्रॅव्हल्सच्या तिकीट बुकिंग ऑफिस मध्ये घडला.

याबाबत शनिवारी (दि. 17) एका महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीमधील चाकण चौकात खुशाल ट्रॅव्हल्स या कंपनीचे तिकीट बुकिंग ऑफिस आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता एक अनोळखी महिला तिकीट बुकिंग ऑफिस मध्ये आली. तिच्यासोबत सात ते आठ महिन्याचे स्त्री जातीचे बालक होते. त्या बाळाला तिकीट बुकिंग ऑफिस मध्ये झोपवून ती महिला बाथरूमला जाऊन येते असे सांगून निघून गेली. ती परत आलीच नाही. याबाबत महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.