Wakad : वाद सोडविणाऱ्या मित्राला चाकूने भोकसले

एमपीसी न्यूज – सहा मित्र दारू पीत बसले असताना दोन मित्रांमध्ये सुरु असलेला (Wakad) वाद सोडविणाऱ्या मित्राला दोन मित्रांनी चाकूने भोकसून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. 16) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास डेअरी फार्मच्या मोकळ्या मैदानात ताथवडे येथे घडली.

अक्षय लोंढे (वय 22), अक्षय पाटील (वय 23, दोघे रा. थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नितीन सुबराव थोरात (वय 28, रा. ताथवडे, पुणे. मूळ रा. धाराशिव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune :  पुण्यातील विविध साहित्याच्या 20 गोडाऊनला भीषण आग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन, त्यांचे मित्र सुमित लोंढे, इजाज सय्यद, समाधान, अक्षय लोंढे, अक्षय पाटील हे सहाजण शुक्रवारी रात्री डेअरी फार्मच्या मोकळ्या मैदानात दारू पीत बसले होते. त्यावेळी सुमित लोंढे आणि अक्षय लोंढे यांच्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादावरून पुन्हा बाचाबाची सुरु झाली.

अक्षय लोंढे याने सुमित याला शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या पोटात चाकूने भोकसून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. वाकड पोलीस तपास करीत (Wakad) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.