Wakad : येरवडा कारागृहातून पळालेला आणखी एक कैदी जेरबंद; वाकड पोलिसांची कामगिरी

Another prisoner escaped from Yerawada jail; Wakad police performance

एमपीसीन्यूज : येरवडा कारागृहातून गुरुवारी (दि. 16) पाच कैदी खिडकीचे गज कडून पळून गेले होते. यापैकी  एका कैद्याला काल, शुक्रवारी दौंड पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आणखी एका कैद्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सनी टायरल पिंटो ( वय.25, रा.पानसरे कॉलनी, साने बिल्डींगजवळ, पडवळनगर, थेरगांव, पुणे ) असे या कैद्याचे नाव आहे. यापूर्वी दौंड पोलिसांनी गणेश आदिनाथ चव्हाण या कैद्याला दौंड येथून अटक केली होती.

येरवडा कारागृहातून गुरुवारी (दि. 16) पाच कैदी खिडकीचे गज कापून पळून गेले होते. अजिंक्य कांबळे, गणेश चव्हाण, अक्षय चव्हाण, देवगन चव्हाण आणि सनी पिंटो अशी त्यांची नावे आहेत.

यापैकी सनी आणि गणेश या कैद्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

कारागृहातून पळून गेलेल्या कैद्यांचा शोध घेण्यासाठी सर्व पोलीस स्टेशनला सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे सदर कैद्यांचा शोध घेत असताना सनी पिंटो हा कैदी थेरगाव येथे येणार असल्याची माहिती वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी सापळा रचून सनी पिंटोला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्याला येरवडा पोलीस स्टेशन ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, पिंपरी चिंचवड अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त विनायक ढाकणे, वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष माने व तपास पथकातील पोलीस कर्मचारी प्रशांत गिलबिले, बाबाजान इनामदार, बापुसाहेब धुमाळ, जावेद पठाण, विक्रम जगदाळे, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, सचिन नरुटे, प्रमोद कदम, नितीन गेंगजे. दिपक भोसले, शाम बाबा, तात्या शिंदे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.