Wakad : लेकीला मारहाण करून बापाचा घेतला चावा

एमपीसी न्यूज – घरातील सामान आणण्यासाठी (Wakad) गेलेल्या मुलीला एकाने मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी मुलीचे वडील गेले असता मारहाण करणाऱ्या व्यक्तीने मुलीच्या वडिलांना दोन ठिकाणी चावा घेऊन जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 31) वाकड येथे घडली.

अजय बाबुलाल शहा (वय 66, रा. सांगली) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौरव अजित शहा (वय 35, रा. वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी तिच्या लहान मुलीला घेऊन वाकड येथे तिचे सामान आणण्यासाठी गेली. यावेळी थोडेच सामान घेऊन जाणार असून बाकीचे सामान नंतर घेऊन जाईन, असे मुलीने सांगितले. त्यावरून गौरव याने फिर्यादी यांच्या मुलीला बेदम मारहाण केली.

Pune : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुण्यात पुन्हा आंदोलन

तिच्या लहान मुलीला देखील गौरव याने मारहाण केली. दोघींना  (Wakad) जिवे मारण्याची धमकी दिली. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेले असता त्यांच्या हाताला दोन ठिकाणी चावा घेऊन त्यांना जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.