Wakad crime News : ऑनलाईनद्वारे मागवला मोबाईल; मिळाले मेणाचे कव्हर

एमपीसी न्यूज – ऑनलाइन खरेदीचा एका ग्राहकाला चांगलाच फटका बसला आहे. त्याने 26 हजारांचा मोबाईल फोन ‘फ्लिपकार्ट’ या ऑनलाइन खरेदी संकेतस्थळावरून मागवला. मात्र, या ग्राहकाच्या हातात चक्क मेणाचे कव्हर आल्याचा प्रकार वाकड येथे सोमवारी (दि. 18) उघडकीस आला.

वाकड येथील महेश विनोदे या तरुणाने पाच दिवसांपूर्वी ‘फ्लिपकार्ट’ या संकेतस्थळावरून ‘सॅमसंग’ कंपनीचा 26 हजार रुपये किमतीचा मोबाईल ऑर्डर केला होता. त्यासाठी त्याने क्रेडिट कार्डद्वारे आगाऊ पैसे देखील भरले. त्यानंतर सोमवारी एका कुरियर कंपनीचा डिलिव्हरी बॉय त्याच्या पत्त्यावर मोबाईलचे पार्सल देऊन गेला.

महेश याने घरी आल्यानंतर पार्सल उघडून पहिले असता त्याला एका कव्हरमध्ये मोबाईलच्या वजनाचे मेण भरले असल्याचे दिसून आले. त्याने तत्काळ संबंधित कंपनीशी संपर्क केला. मात्र, त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला देऊन जबाबदारी झटकली.

_MPC_DIR_MPU_II

ऑनलाइन वस्तू खरेदी करताना घ्या काळजी

ऑनलाइन वस्तू खरेदी करताना लोकप्रिय, विश्वासार्ह संकेतस्थळाचा वापर करा. आपला व्यवहार सुरक्षित असल्याची खात्री करा. डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत शक्यतो पार्सल उघडा. शॉपिंग साईटने दिलेल्या सूचना पाळा.

यापूर्वी ऑनलाइन माध्यमातून मागावलेल्या वस्तूंच्या ऐवजी वीट, साबण, कागद आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यानंतर मेणाचे कव्हर आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.