Wakad : आयटी अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या

IT engineer commits suicide by strangulation प्रशांत हे हिंजवडी येथील 'टाटा टेक्नॉलॉजी' या कंपनीत नोकरी करीत होते.

एमपीसी न्यूज- हिंजवडी येथील एका आयटी कंपनीत काम करणा-या अभियंत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्मत्या केली. हा प्रकार गुरुवारी (दि. 18) दुपारी दोनच्या सुमारास वाकड येथे उघडकीस आला आहे.

प्रशांत नरेंद्र सेठ (वय 32, रा. कॅप्रेसिया सोसायटी, वाकड) असे आत्महत्या केलेल्या आयटी अभियंत्याचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रशांत सेठ हे मूळचे मध्यप्रदेश येथील इंदोरचे रहिवासी आहेत.

ते मागील काही वर्षांपासून वाकडमध्ये राहत होते. प्रशांत हे हिंजवडी येथील ‘टाटा टेक्नॉलॉजी’ या कंपनीत नोकरी करीत होते.

दरम्यान, गुरुवारी दुपारी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औंध उरो रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

प्रशांत यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. वाकड पोलीस करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.