Wakad : रहाटणीत सव्वा दोन लाखांची घरफोडी!

एमपीसी न्यूज – दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी दोन लाख 25 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 15) रात्री रहाटणीतील शिवराजनगर येथे घडली.

अभिजित किशोर वीरगावकर (वय 32, रा. रेजेन्सी पॅराडाईज सोसायटी, शिवराजनगर, रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सव्वा आठ ते रात्री अकरा वाजताच्या दरम्यान फिर्यादी वीरगावकर यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला.

आतील दोन लाख 7 हजार रुपये किंमतीचे 83 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, तीन हजार रुपये किंमतीचे 50 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, 10 हजार रुपयांचा कॅमेरा, रोख पाच हजार रुपये आणि लॉकरची चावी असा एकूण दोन लाख 25 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.