Pimpri : महापालिकेच्या वतीने क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि लहुजी वस्ताद यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि लहुजी वस्ताद साळवे यांना पुण्यतिथीनिम्मित पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

चिंचवड स्टेशन जवळील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि लहुजी वस्ताद साळवे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी अभिवादन केले. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आणि स्वतंत्र्य चळवळीचे पुरस्कर्ते लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथीनिम्मित आयोजित कार्यक्रमात त्यांनी या महापुरुषांना अभिवादन केले.

याप्रसंगी अ -प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम. एम. शदे, लोकशाहिर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव सिमती अध्यक्ष सतीश भवाळ, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, युवराज दाखले, संजय ससाणे, आसाराम कसबे, वशाल कसबे, सुनिल भिसे, आशा शहाणे, मीना कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.