Wakad : गांजा विक्री प्रकरणी महिलेस अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Wakad)एका महिलेला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 4) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास काळाखडक येथे करण्यात आली.

पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dighi : लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळाखडक येथे एक महिला गांजा विक्री करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून 50 हजार 500 रुपये किमतीचा दोन किलो 20 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. वाकड (Wakad)पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.