Dighi : लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – लग्नाच्या आमिषाने तरुणाने महिलेला (Dighi) घरी बोलावून घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना जानेवारी 2022 ते 4 फेब्रुवारी 2023 या कालावधीत बोपखेल येथे घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यशदीप शिवाजी शिंदे (वय 25, रा. बोपखेल) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Chinchwad News: आमदार अश्विनी जगताप यांनी पक्ष संघटनेचा घेतला आढावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशदीप याने फिर्यादी सोबत लग्न करतो असे सांगून लग्नाची बोलणी करण्यासाठी त्याच्या घरी बोलावून घेतले. तिथे फिर्यादीवर जबरदस्तीने (Dighi) लैंगिक अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.