Walhekarwadi: लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्याने कामगाराची आत्महत्या ; तीन दिवसात सहा जणांनी संपवले जीवन

Worker suicide due to lockdown; Six people lost their lives in three days

एमपीसी न्यूज – लॉकडाउन झाल्यापासून हाताला काम नसल्याने आलेल्या आर्थिक विवंचनेतून एका कामगाराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (शनिवारी) वाल्हेकवाडी, चिंचवड येथे सकाळी दहा वाजता उघडकीस आली. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून शहरात आत्महत्यांचे सत्र सुरु असून आतापर्यंत एकूण सहा जणांनी आपले जीवन संपवले आहे.

कृष्णात गणपत जगदाळे (वय 38, रा. दत्तनगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे.

जगदाळे मूळचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते टर्नर म्हणून काम करत होते. लॉकडाऊन झाल्यापासून त्यांच्या हाताला काम नव्हते.

लॉकडाउन शिथिलतेनंतर ते पुन्हा गावावरुन शहरात आले होते. परंतु, त्यांना काम मिळाले नाही. त्यामुळे त्यांना नैराश्‍य आले होते.

या नैराश्‍यातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आपल्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये, अशी सुसाइट नोट त्यांनी लिहिले आहे.

त्यांनी एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती चिंचवड पोलिसांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.