Moshi: प्रवासादरम्यान महिलेच्या दीड लाखाच्या दागिन्यांवर डल्ला

During the journey, the woman's jewelery was worth Rs 1.5 lakh stolen

एमपीसी न्यूज – प्रवासादरम्यान महिलेने दोन डब्यात ठेवलेले 45.620 ग्रॅमचे 1 लाख 40 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने तीन महिलांनी लंपास केले. मोशी येथे साडेतीन महिन्यांपूर्वी ही घटना घडली.

याबाबत मोशी येथील 28 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या 4 मार्च रोजी भोसरी येथून नाशिककडे जाणार्‍या बसमधून प्रवास करत होत्या. त्यांनी बॅगमधील दोन डब्यांमध्ये दागिने ठेवले होते.

सोनसाखळी, सोन्याच्या दोन अंगठ्या, चांदीचे ब्रेसलेट, छोटे गंठण असे 45.620 ग्रॅमचे 1 लाख 40 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने डब्यात होते.

बसमध्ये त्यांच्या बाजूला उभ्या राहिलेल्या तीन महिलांनी हे दागिने चोरल्याचा फिर्यादी यांना संशय आहे. कुरकुटे या घाबरल्याने गावी जाऊन आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार केली.

त्यानंतर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला. फौजदार डेरे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.