Warje News: दीपाली धुमाळ यांच्या प्रयत्नातून 35 एकरांत वनोद्यान; अजित पवार यांच्या हस्ते उद्या होणार भूमिपूजन

एमपीसी न्यूज – विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांच्या प्रयत्नातून 35 एकरांत वनोद्यान साकारण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या (शुक्रवारी) सकाळी या उद्यानाचे भूमिपूजन होणार आहे. 

वारजे येथे डुक्कर खिंडीजवळ वन विभागाच्या 35 एकरांत वन विभाग व पुणे महानगरपालिका यांच्यावतीने संजीवन वनोद्यान साकारण्यात येणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी आज पत्रकारांना दिली. यावेळी माजी नगरसेवक आणि शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती येनपुरे उपस्थित होते.

हे उद्यान व्हावे यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून दीपाली धुमाळ यांचा पाठपुरावा सुरू होता. त्याला अखेर यश आले. वारजेकरांच्या निरोगी आरोग्यासाठी हे उद्यान महत्वपूर्ण ठरणार आहे.

कोरोना संकट काळात सर्वांनाच ऑक्सिजन आणि निरोगी आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व पटले आहे. या उद्यानात आल्यावर वारजेकरांचा दिवस प्रसन्न आणि आरोग्य संपन्न होणार आहे, असेही दीपाली धुमाळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.