Water Supply News : पिंपरी चिंचवड शहरातील काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड (Water Supply News) महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जल उपसा केंद्रातील मुख्य पाईपलाईन काढायचे काम तातडीने हाती घ्यावयाचे असल्यामुळे उद्या गुरुवार 13 ऑक्टोबर रोजी पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.
हा पाणीपुरवठा थेरगाव ग्रॅव्हिटी व रावेत किवळे ग्रॅव्हिटीवरील सर्व भाग- थेरगाव, काळेवाडी, विजयनगर, रहाटणी, वाकड, पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन टाकीवरील भाग, पिंपळनेर, विशाल नगर, पुनावळे, ताथवडे, रावेत सेक्टर 29 च्या टाकीवरील भागासह, किवळे, मामुर्डी, विकास नगर, जिल्हा रुग्णालय व उरण रुग्णालय, सांगवी, बालेवाडी स्टेडियम, निगडी प्राधिकरण, सेक्टर क्रमांक 21 ते 28, आकुर्डी, खंडोबा माळ, मोहन नगर, रामनगर, संभाजीनगर, शाहूनगर, कृष्णानगर, इंद्रायणी नगर, पांजरपोळ, सेक्टर 12, बोऱ्हाडेवाडी, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोवीसावाडी, जाधववाडी कुदळवाडी, फुलेनगर, शिवतेजनगर, पूर्णानगर, शरद नगर, सुदर्शन नगर, नेवाळेवस्ती, हरगुडेवस्ती, रुपीनगर, चिखली या भागातील पाणीपुरवठाची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

उद्या गुरुवारी 13 ऑक्टोबर रोजी या भागांमध्ये मनपा मार्फत होणारा सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील उपरोक्त भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवण्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील उपरोक्त भागात दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होईल.
तरी नागरिकांनी मनपाकडील उपलब्ध पाण्याचा (Water Supply News) पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करून मनपा सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.