Pune Reel Star : चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी रिल्स स्टार बनला चोर; आता बसला तुरुंगात

एमपीसी न्यूज : चांगले व्हिडिओ (Pune Reel Star) तयार करण्यासाठी एका रिल्स स्टारने चोरीचा मार्ग अवलंबला. त्या तरुणाने चक्क मोबाईल चोरला होता. परंतु, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या चोराचा शोध लावत त्याला अटक केली आहे. पुणे ग्रामीण परिसरातील रांजणगाव पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. संजय बोराडे असं अटक करण्यात आलेल्या या तरुणाचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव गणपती परिसरात संजय बोराडे हा राहतो. व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर टाकण्याचे त्याला व्यसन आहे. सोशल मीडियावर त्याचे (Pune Reel Star) पन्नास हजारहून जास्त फॉलोवर्स देखील आहेत. चांगले व्हिडिओ तयार करण्यासाठी त्याला मोबाईलची गरज होती. मात्र, मोबाईल घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्याने मोबाईल चोरला होता. रांजणगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.